Posts

Showing posts from March, 2023

प्रेमगीत

प्रेमगीत प्रेम म्हणजे काय असतं दुसरं तिसरं काही नसतं तुमचंआमचं सारखचंअसतं म्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।। धृ।। प्रेम लहानपणी बागेत,गच्चीवर, कॅन्टीनमध्ये,सहलीत अनुभवलं सुरवंटाच फूलपाखरू झालं कळी उमलली,फूल जहालं म्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।1।। प्रेमासाठी शाळा काॅलेजात,नाटक सिनेमात, रूसणं फुगणं ,मौजमजा,मस्ती केली प्रेमाचे इशारे झाले,विरहाचे कढ सोसले म्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।2।। पुढे डिग्री मिळाली,आणाभाका झाल्या नोकरी मिळाली,अन दोनाचे चार झाले अनमग प्रेमाचे पाट वाहू लागले म्हणून म्हणतो प्रेमगीत गावे.।।3।। फूल गळे बघ फळ गोड जहाले कळलंच नाही,चाराचे आठकधी झाले आता एकच बाणा,आणा आणा विसरलो मी आता चहाटळपणा, तरीही म्हणतो प्रेमगीत गावे.।।4।। नाही आता हिरवटंपणा नाहीआता हावरटपणा नाही आता गवाक्ष,नाही आता कटाक्ष तरीही म्हणतो प्रेमगीत गावे.।।5।। अरे नाही मी आंबटशोकीन पण प्रेमासाठी वज्राहून कठीण लिहून झाली प्रेमाची ही गाथा आवडीने वाचा ही प्रेमकथा तरीही म्हणतो प्रेमगीत गावे.।।6।। ।।आहेर वाळू रघुनाथ,नासिक।।

साखर धंदा आज आणि काल

साखर धंदा आज आणि काल ऊस740गेला,419गेला,671पण गेला। आता आला86032 अन 265 हीआला।। ऊस वाहतूकीचं लाडीस गेलं,खटारे गेले। आता ट्रकट्रॅक्टर,अन हैड्राॅलिक टिप्पर आले।। 400-500टनाचे साखर कारखाने गेले। नवे 5000-10000टनाचे कारखाने आले।। तीन रोलरची ट्रॅसप्लेटची पुरानी मील गेली। जीआरपीएफ,टीआरपीएफची नवीमिल आली।। वाफेचे इंजिन गेलं,मील टर्बाइन गेले। नवीन एसी मोटर व्हीएफ डीआले।। ज्युस हीटर गेले,नवे डीसीएच,पीएचई आले। जुन्या राॅबर्ट बाॅडी गेली नवे एफएफई आले।। जुने बॅच पॅन गेले,नवे कन्ट्युनिअस पॅन आले। बॅच सेंट्रीफ्यगल गेले, ट्रॅन्झिएंट हीटर गेले। नवे कन्ट्युनिअस,ऑटो सेंट्रीफ्यगल आले।। साखरेचे कलर 29,30,31 बाद झाले। नवेकलर ईकुमसा 40,50,60 रूजू झाले।। शेतकरी कामगार तेच राहिले, तिथेच राहिले। कारखाने मात्र सहकारीचे खाजगी झाले।। जुने प्रेम गेले,एकोपा गेला,स्कील गेले। आता नवे आयएसओ आले,कायझन आले।। कवी-वाळू रघुनाथ आहेर,नासिक 9958782982

नमीता

नमीता जेव्हा मी आजोबा झालो आकाश मला गवसले नातीचे लोभस रूप पाहून तृप्त झाले डोळे माझे बाळलीला पहाताना दुडूदुडू चालताना चिमखडे बोल बोलताना हरखून गेले मन माझे लटका रुसवा, अवखळ खोड्या स्वतः हसून घराला हसवणारी नात दुधावरची साय , अन मुद्दलवरचे व्याज आजी बाबांचा साज ही आहे चालती बोलती निरमाची जाहिरात धीट मोठी बोलायला गोड मोठी दिसायला मोबाइलची मोठी भक्त चाॅकलेट पाहिजे फक्त काळे डोळे फिरविते गोरे नाक ऊडविते. लुटूपुटूची लढाई दादाशी लई लाड करते मावशी मम्मी पप्पाचा लई लई लळा आणि बाकीच्यांचा कळवळा कवी--वाळू रघुनाथ आहेर नासिक-9958782982

विना सहकार नाही उध्दार।

म्हण आहे विना सहकार नाही उध्दार। सहकारी कारखानदारीचा मुळ विचार।। त्यातून पुढे जन्मला आपला स्वाहाकार। मग झाला हो सगळीकडे हाहाकार।। अपप्रवृत्ती वाढल्या,प्रगती खुंटली । सरकारने साखरेच्या एमएसपी आणि ऊसाची एफआरपी नाही जोडली।। पीएफ भरला नाही,कर्ज व्याज नाही भरले । त्याने कारखाने आजारी पडले।। आणि गेले बँकेच्या ताब्यात । शेतकरी हवालदिल, कामगार देशोधडी।। निम्मी कारखानदारी झाली खाजगी । निम्मी राहिली सहकारी अन सरकारी ।। आता सरकारने जोडली साखरेची एमएसपी आणि ऊसाची एफआरपी । इथेनॉलचा चिराग दिला हाती ।। कारखान्यांचे भविष्य इथेनॉल हाती । बगॅसचे उपपदार्थ साखर उद्योग उध्दारी।। जास्त रिकव्हरीचा ऊस लागवड करा । आधुनिकीकरणआणिऑटोमेशनकरा।। येईल कामगार, शेतकऱ्यांत समाधान। पुन्हा म्हणू विना सहकार नाही उध्दार।।

बांधवा अजब तुझे सरकार ।।

।।बांधवा अजब तुझे सरकार ।। जीएसटी लावी अपरंपार । जनतेला सोसवेना करभार । तयासाठी रोजच भरे दरबार । तरीही महागाईचा पडतोय मार।। आटा चाळीसला किलोभर । द्या सिलिंडरला हजारभर। दुधात भेसळ,अन भाव ऐशीवर । गरीबाला मिळेना अन्न पोटभर ।। इथे मुलींना मरण जन्मता । बालविवाहाची नाही कमतरता। बलात्काराची रोजच येते वार्ता । होई फक्त चर्चा कुपोषणाने मरता ।। स्वस्त डाटा , अन महाग आटा। एसटीला नाही डिझेल पुरवठा । एअर इंडियाला पदरात घेई टाटा । जगात पाचवाआमचा फौजफाटा ।। काॅपी करून पोरं पास होती। परिक्षे विना वरच्या वर्गात ढकलती । आरक्षणाचे गाजर दाखविती । नोकरी मागता अंगठा हलविती ।। ।।बांधवा अजब तुझे सरकार ।।

दमलास काय बा विठ्ठला तु।।

दमलास काय बा विठ्ठला तु।। जनी नामयाची दासी,करि मदत तिजशी। कबीराने जाणिले जनाबाईशी जनीचे दळण दळिता, गोव-या थापता । दमलास काय बा विठ्ठला तु।।1।। कबीर दासाचे शेले विणिशी । रोहिदासाचे जोडे बनविशी । भक्तांचिये कामं करता करता। दमलास काय बा विठ्ठला तु।।2।। रेड्यामुखी वेद वदविले ज्ञानासाठी । भिंत चालविली मुक्ताईसाठी । संन्याशाच्या पोरांना मदत देता देता । दमलास काय बा विठ्ठला तु।।3।। नामयाचे लाड पुरवितो । दही भाताचा नैवेद्य खातो । नामयाला गुरू देता देता । दमलास काय बा विठ्ठला तु।।4।। व्यापारी तुकोबाची सचोटी टिकविशी । लोक कल्याणाचे अभंग रचविशी । इंद्रायणीत गाथा बुडू न देतांना । दमलास काय बा विठ्ठला तु।।5।। आम्हीही करितो तुझी आराधना । आवरा दुर्जना, अभय दे सज्जना। समचरण पाहू या तुझे विटेवरी । दमलास काय बा विठ्ठला तु।।6।। आहेर वा.र. नासिक 9958782982

।।धाव घेई विठूराया आता चालू नको मंद।।

।।धाव घेई विठूराया आता चालू नको मंद।। राऊळी मंदिरीबडवे मज लुटती गंगेवरी उपाध्ये कर्मकांड करविती अजाबलीसाठी मांत्रिकही कष्टविती तयानेच कंठ माझा सुकला धाव घेई विठूराया आता चालू नको मंद।। दुकानदार मापात पाप करि कापडात मिटराचा वार करि तेलात किलोचा शेर करि तयानेच कंठ माझा सुकला धाव घेई विठूरायाआता चालू नको मंद।। विहीर तयार होई फक्त कागदावरि रस्ते दिसती फक्त फायलीवरि टेबलाखालून चाले सर्व व्यवहार तयानेच कंठ माझा सुकला धाव घेई विठूरायाआता चालू नको मंद।। सातबारावर तलाठ्याला अडचण घरासाठी ग्रामसेवकाला अडचण शेती कर्जाला सचिवाला अडचण तयानेच कंठ माझा सुकला धाव घेई विठूरायाआता चालू नको मंद।। बालवाडीत प्रवेश महाग फार मास्तर कलंदर ,शाळेत पोरं बेजार ऑनलाईन शिक्षणाने काॅलेज ओसाड तयानेच कंठ माझा सुकला धाव घेई विठूरायाआता चालू नको मंद।। पक्ष सगळे सारखेच, त्यानं राजकारण गेलं चुलीत पेट्रोल गेलं वर ,कपाशी आली खाली विकासाचा बोलबाला, आपण जगात तिसरे मजूर किलोभर ज्वारीसाठी रोज हात पसरे तयानेच कंठ माझा सुकला ।।धाव घेई विठूराया आता चालू नको मंद।...

ऊसाचा संसार

ऊसाचा संसार ऊसाला झाली दोन दोन पोरं, मोठा मुलगा ‘गुळ’ अन् धाकटी मुलगी ‘साखर’ साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर, गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर साखर तशी स्वभावाला गोड, तिच्यात उणेपणा शोधणं अवघड गुळ मात्र स्वभावाला चिकट, समोर दिसला की ईतरांना वाटे संकट साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळुन जाई, गुळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड, गुळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता ‘ओबडधोबड’ साखरेचे रव्यावर प्रेम जडले, बापाने लगेच् दोघांचे लग्नच् लावुन टाकले तीला झाला एक मुलगा दिसायला होता तो गोरागोरा, यथावकाश बारसे झाले, नांव ठेवले ‘शिरा’ ऊसाला आता काळजी वाटु लागली गुळाची, त्याच्या साठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची ? ऊसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग, सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग बर्‍याच मुली पाहील्या, कोणी त्याला पसंत करीना, काळजी वाटे ऊसाला रात्री झोप येईना ऊसाला मित्र एक होता, नांव त्याचे तूप त्याने प्रयत्न केले खुप, अन् ऊसाला आला हुरुप त्याने मुलगी सुचविली गव्हाची, जी दिसायला ह...

हो म्हणूनच मी आहे घाईत

हो म्हणूनच मी आहे घाईत।। सेवानिवृत्तीच्या दिवशी मला सजवला जसा सजवता घाण्याचा बैल पोळ्याला मला हारशालीसह घरी पोहोचविला सोबत पेन्शन अन मोठा चेक दिला आज मी माझी सरलेली वर्षे मोजली आणि अचानक माझ्या लक्षात आलं अरेच्या जेवढं माझं जगून झालंय त्यापेक्षा कमीच आयुष्य उरलंय जेव्हा लहान मुलं आवडीने खाऊ खाते अन मग दिसतंय थोडाच खाऊ उरला तेव्हा मुलं मन लावून खाऊ खाते मलाही तसंच वाटतंउरलेल्या आयुष्याचं कोणताही विधिनिषेध बाळगणार नाही या पोकळ चर्चांना आता मलावेळ नाही वय वाढले म्हणजे बुध्दी वाढत नाही अशांशी वाद घालायची इच्छा नाही मला खऱ्याखुऱ्या माणसांत जगायचंय जी स्वतःच्या चुकांवर हसतात अन विजयानेही नम्र होतात नेहमीच दुस-याला सावरतात आपल्या कर्माची जबाबदारी घेतात दुस-याच्या ह्रदयाला स्पर्श करतात आयुष्याचे फटकारेही झेलतात अन पवित्र स्पर्शाने मोठेपण पेरतात मला आयुष्य परिपूर्ण जगायचंय जे उत्कटतेने,प्रगल्भतेने भरलंय त्यासाठी माझ्याकडे उरलेली जराशीही वेळ मलाफुकट घालवायची नाही माझं आता एकच ध्येय आहे प्रेमीजनांसोबत विवेक बुध्दीने जगायचंय शांततेने,समाधाना...

प्रार्थना

।प्रार्थना।। प्रभु करा दया अपार समोर आहे कडेकपार नको अपेक्षांचे लटांबर बसू दे समाधानाने काठावर ।। नको देऊ असुयेचा सहवास अन नको कुणाचा दुश्वास करू बापड्यांसाठी अट्टाहास न घडो कुणाला जगी उपवास।। जाऊ द्या तिमीर दुरितांचे होऊ या मायबाप अनाथांचे सुख मिळावे नामसंकीर्तनाचे होईल सार्थक नश्वर जीवनाचे ।। नको मज विरक्ती नको मज आसक्ती भवसागर पार कराया दे मज शक्ती असु दे मज ठायी तुझी भक्ती आस लागली मिळो मज मुक्ती।। रचनाकार:आहेर वा.र.नासिक 9958782982

हे लोकशाही

हे लोकशाही...!!! हे लोकशाही सांग या भुकेसाठी काय खाऊ? निळ्या आकाशाखाली रडणा-या ऊसतोड मजुरांच्या लहानग्याचे आर्त स्वर खाऊं....!!! अथवा कर्जबाजारी शेतकऱ्यांची कवडीमोल पिकाभोवतीची स्वप्ने खाऊ....!!! तु आपल्या कामगार शेतकऱी विरोधी धोरणांची शपथ घेऊन सांग हा भुकेचा वनवा कसा विझवू...? रेती काढून रित्या झालेल्या,शहरांतील गटारगंगा नदीचे अश्रू पिऊ...? अवैध उत्खननाने बोडके झालेल्या डोगरांच्या वेदना पिऊ? बेकारीच्या चिखलात रुतलेल्या तरूणांला कसा वर काढू... ? हे लोकशाही सांग या फाटलेल्या आभाळाला कुठं कुठं ठिगळं लावू...? रचनाकार:आहेर वा.र.नासिक 9958782982

ऐका हो पांडुरंगा

।ऐका हो पांडुरंगा।। घेईल गोड नाम तुझे वाचेने माझिया। स्थिरहोतील लोचने समचरणीतुझिया।। ऐका रे कान हो विठुरायाचे गणगान। हातांनो करा रे करा हरिभजन।। पाऊले चाला रे पंढरीची वाट। जीवलगाची होईल भेटगांठ ।। लागु दे माझा नश्वर देह कारणी। धाव घेई मना विठ्ठलाचे चरणी।। नको सोडू जीवा हा भगवंत । चरणी माथा ठेवुनी करू दंडवत।। विसर न व्हावा तुझा श्रीरंगा। माझी विनवणी ऐका हो पांडुरंगा।। रचनाकार:आहेर वा.र.नासिक 9958782982

स्तुतीसुमने

स्तुतीसुमने।। पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठला । देवांचा शिरोमणी हा एकला ।। गळा वैजयंतीमाला रूळतसे । कंठी कौस्तुभ मणी विराजीतसे ।। मकरकुंडले शोभति श्रवणी। तुझे पायीची सुखावली धरणी ।। शिरी मुकुट शोभे फाकली प्रभा । वामांगी रखुमाई दिव्य तयाची शोभा ।। कासे पितांबर कस्तूर ललाटी । गरूड हनुमंत पुढे उभे ठाकति ।। भीमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणीच्या गंगा।। उध्दव अक्रूरउभे भूमंडळी । हजेरी लावती संतमंडळी ।। ज्ञाना तुका गोरा चोखा बंका । सोपान मुक्ता जनी नामा एका ।। सम चरण ठेवुनिया विटेवरी । उभा पांडुरंग ठेवुनिया कर कटेवरी ।। झाली तयाला युगे अठ्ठावीस । पुंडलिका भेटीसाठी हा प्रयास ।। रचनाकार:आहेर वा.र.नासिक 9958782982

सुस्वागतम

सुस्वागतम -ऑफ सिझन२३ गळीत संपले,संपला आता सिझन। करा प्राथमिक सफाई झटकन।। केनयार्ड अन् बगॅस यार्डसाफ करा । सर्व केरकचरा कंपोस्ट मध्ये भरा ।। चिमणी- बाॅयलरची राख साफ करा । हाॅपर एलेव्हेटर ग्रेडर साफ करा।। सायलो अन् कैची काॅलम साफ करा। शुगर हाऊसचीसाखर गोळा करा ।। क्रिस्टलायझर,सिरप टाक्या खालीकरा। केनकॅरिअर,मील धुऊन सफाई करा।। बाॅयलींग हाऊस मशिनरी धुऊन काढा । टर्बाईन,गिअर बॉक्स चे ऑईल काढा।। बाॅयलरकेमिकल करा ट्युबसफाईकरा। स्प्रे इंजेक्शन इटीपी त्वरित साफकरा।। गॅस, सिरप ,स्प्रे पाईप खोला भराभरा। एनडीटी टेस्ट वॉटर टेस्ट लवकर करा।‌। खराब पाईप बेंड व्हॉल बाजूला करा। नवीन मालाचे मागणीपत्र सादर करा।। याप्रमाणे ऑफ सिझनची तयारी करा । सिझन२३/२४चा ध्यासधरा ध्यासधरा।। रचनाकार :वा.र.आहेर नासिक. ९९५८७८२९८२

सुनबाई सुनबाई

सूनबाई सूनबाई नको बाई रुसू अन कोपऱ्यात बसू। सासूसास-याला करु नकोधुसफूसू ।। नवरा येताच नको करु दांडपट्टा सुरु। आदळ आपटून पलंगावर नको पसरु ।। दीराला पाण्यात पाहू नकोस । नणंदेला टाकून बोलू नकोस ।। करूनका वसवस जरा धीर धरा । घाला मायेची पाखर प्रेमाचा पिसारा।। घरात आपुल्या नका घडवू महाभारत । करूया सणवार साजरा परत परत।। होईल बोभाटा मारकी म्हैस म्हणून । बोला प्रेमाने धरू नको लई ताणून ।। आपल्या घराची कळा सांगतं आंगण । करा घरच्या मुलाबाळांची पाठराखण ।। P रचना:वा.र.आहेर. नासिक 9958782982

नाही कुणाला भिणार

।नाही कुणाला भिणार।। सहकारी असो वा खाजगी आम्ही साखर कारखानदार नाही आम्हाला कुणाची पर्वा नाही कुणास आम्ही भिणार।।१।। काटा मारणे आमचा अधिकार एफआरपी वेळीच नाही देणार नाही आम्हाला कुणाची पर्वा नाही कुणास आम्ही भिणार।।२।। वेळीच पगार देणे नाही जमणार चार सहा महिने तरी लांबविणार नाही आम्हाला कुणाची पर्वा नाही कुणास आम्ही भिणार।।३।। नदीला पूर येता त्यात मळी सोडणार काजळी घरोघरी आम्ही पोहचवणार मासे मेल्याची नाही आम्हाला पर्वा नाही कुणास आम्ही भिणार।।४।। प्रदुषण नियंत्रण अधिका-यावर आमचेच नियंत्रण असणार नाही आम्हाला कुणाची पर्वा नाही कुणास आम्ही भिणार।।५।। एक्सपान्शन, मॉडर्नायझेशनसाठी कर्जाचा डोंगर आम्ही उभा करणार सबसिडी सवलती आम्ही मिळविणार नाही आम्हाला कुणाची पर्वा नाही कुणास आम्ही भिणार।।६।। येता साखर आयुक्ताचा इशारा करति सगळे जण वारासारा एफआरपी मिळे भरभरा पगारालाहि गति येई जरा सगळे साखर आयुक्ताला भिणार।।७।। रचनाकार: आहेर वा.र.नासिक. ९९५८७८२९८२

हरिनामाचा महिमा

। हरिनामाचा महिमा।। मीराबाई सारखे आर्जवाने बोलवत नाही।। म्हणून तर तुम्हाला भगवंत भेटत नाही।। नाम्याच्या प्रेमळ दटावणीने भरवत नाही। म्हणून भगवंत तुमचा नैवेद्य खात नाही।। माता यशोदेप्रमाणे जोजवत नाही। म्हणून भगवंताला झोपवता येत नाही।। गोपींसारखे तुम्ही नाचत नाही। म्हणून भगवंत तुमच्यासह नाचत नाही।। कामामध्ये राम आहे,काम करा। कबीरासारखे भगवंतांचे काम करा ।। प्रभुलाही तुमची आठवण येईल। भगवंत तुम्हांलाही दर्शन देईल ।। भाव तेथे देव, देव भावाचा भुकेला हरिनामाचाच फक्त इथे चाले वशिला म्हणा श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी। जय नाथ नारायण वासुदेव हरी।। रचनाकार: आहेर वा.र.नासिक ९९५८७८२९८२

माझी माय

माझी माय ।। ती माझी होती माय, माझी आई । आम्ही सारे म्हणायचो तिला बाई । सासरचं नाव होतं सारजाबाई । माहेरचं नाव होतं जिजाबाई । तीन इसा म्हणजे होतात साठ। एवढंच होतं तिचं गणित पाठ। बाकी काला अक्षर भैस बराबर । पण होता तिचा विवेक सारासार । रोजचं खुरपणी सोंगणीची कामं होती। पण गरीबी तिची पाठ सोडत नव्हती। रोजचं कोंडंयाचा मांडा करीत होती । तेव्हा हातातोंडाची गांठ पडत होती। आम्ही सात भावंडे हा तिचा विरंगुळा। मंगळसुत्र सोडून बाकी गळा मोकळा। डोईवर पदर , कपाळावर कुंकू मोठं। बाई नाही बोलायची कधीच खोटं। बैलढोरं,सोनंनाणं मालकानं विकलं। नशीबाचा भोग समजून सारे सोसलं। जवा आम्ही सगळे शिकून साहेब झाले। तवा तिच्या चेहर्‍यावरही हासू दिसले। तेव्हा तिला वाटलं सुखाचे दिवस आले। आम्हाला समाधान झाले भरून पावले। रचना:आहेर वा.र.नासिक 9958782972