साखर धंदा आज आणि काल
साखर धंदा आज आणि काल ऊस740गेला,419गेला,671पण गेला।
आता आला86032 अन 265 हीआला।।
ऊस वाहतूकीचं लाडीस गेलं,खटारे गेले।
आता ट्रकट्रॅक्टर,अन हैड्राॅलिक टिप्पर आले।।
400-500टनाचे साखर कारखाने गेले।
नवे 5000-10000टनाचे कारखाने आले।।
तीन रोलरची ट्रॅसप्लेटची पुरानी मील गेली।
जीआरपीएफ,टीआरपीएफची नवीमिल आली।।
वाफेचे इंजिन गेलं,मील टर्बाइन गेले।
नवीन एसी मोटर व्हीएफ डीआले।।
ज्युस हीटर गेले,नवे डीसीएच,पीएचई आले।
जुन्या राॅबर्ट बाॅडी गेली नवे एफएफई आले।।
जुने बॅच पॅन गेले,नवे कन्ट्युनिअस पॅन आले।
बॅच सेंट्रीफ्यगल गेले, ट्रॅन्झिएंट हीटर गेले।
नवे कन्ट्युनिअस,ऑटो सेंट्रीफ्यगल आले।।
साखरेचे कलर 29,30,31 बाद झाले।
नवेकलर ईकुमसा 40,50,60 रूजू झाले।।
शेतकरी कामगार तेच राहिले, तिथेच राहिले।
कारखाने मात्र सहकारीचे खाजगी झाले।।
जुने प्रेम गेले,एकोपा गेला,स्कील गेले।
आता नवे आयएसओ आले,कायझन आले।।
कवी-वाळू रघुनाथ आहेर,नासिक
9958782982
Comments
Post a Comment