Posts

Showing posts from January, 2024

॥उध्दार पामराचा ॥

  ॥ उध्दार पामराचा ॥ लोंबती लक्क्तरे तयाचि, लाळही गळे  विपन्नावस्थेत उभा रस्त्यावर तो पामर बळे। नाही कुणास चिंता त्याच्या भुकेची नाही कुणास दया त्याच्या अपंगांची ॥१॥  रूपेरी दौलतीचे धनी वाकुल्या दाखवित   राजरोस पळती आलिशान गाडीत । पथिकांचेही गावीही नसे त्याचे आक्रीत   या नि:संग वृतीने आला तो जीव धोक्यात ॥२॥ सरकार दरबारात अर्ज त्याचा फायलीत  हलेना तो वजनाविना म्हणती ती जग रीत । रोज करि नमस्कार परि घडेना चमत्कार  आर्जविता नेत्यास तो टाकीतसे फुत्कार ॥३॥ बघुनि त्यास एकदा कळवळला एक दयावंत    उपचार करि बळे नेऊन पथिकाश्रमात । केशवपनाचा सोहळा झाला नवी वस्रे ल्याला   खुप दिवसांनी मिष्टान्न खाऊन तृप्त झाला ॥४॥   वेळीच कौशल्य मिळवून विणकामाचे   स्वहस्ते भरजरी शेला विणितसे रामाचे।  तयाचा झुकलेला माथा उन्नत झाला  जगी एका पामराचा उध्दार झाला ॥५॥ रचनाकार:आहेर वा.र.नासिक बी.ई.एमआयई.बीओई ९९५८७८२९८२

व्यथा गुरुजींची

  व्यथा गुरुजींची  घंटा वाजली, शाळा सुटली  पोरं दंगा करत घरी पळाली  खडूची धुळ झटकली पंचाने  गुरूजींनी घाम पुसला रुमालाने   घशाची तहान भागवली पाण्याने  आठी पडली कामाच्या यादीने   रात्रीचे साक्षरता वर्ग सुरु करा  जनगणना करा,कुष्ठरोग्यांची यादी करा  मासिक तक्ते, हजेरीपट भरा  सरपंचाच्या मुलाची घ्या शिकवणी हेडमास्तरची ऐकताच दटावणी  आमचे आदर्श साने गुरूजी चितळेमास्तर, हिरवे गुरुजी  निकाल आमचा शंभर टक्के  सातव्या वेतनाने आम्ही पक्के नाठाळा करितो आम्ही सरळ  ऐकतो बरळ, परि वागतो करळ  आम्हीच सांदिपनी अन वशिष्ठ  मायबापानंतर आम्हीच श्रेष्ठ  रचनाकार:आहेर वा.र.नासिक  9958782982

आयुष्याची गाडी

 आयुष्याची गाडी हळुहळू चालवा ही आयुष्याची गाडी। अजून बरीच सोडवायची हो कोडी॥ काही दुखणी व्हायची बरी। काही कामे करायची पुरी॥ काहींना सोसवेना धडाका। उडाला हो रागाचा भडका॥ आहेरे नाहीरे समीप आणायचे आहेत। काही इच्छा अजूनही अपूर्ण आहेत॥ दबलेल्या इच्छा दफनायच्या आहेत। अनेक कर्जे अजून भरायची आहेत॥ काही दूर गेली काही मागे पडली। काही नाती बनली आणि तुटली॥ त्या तुटलेल्या नात्यांमधल्या,। जखमा भरायच्या राहिल्या॥ काही सहभागींना मी डावलले । तर काहींचे मन मी दुखावले ॥ आसू पुसायला कोणीच नाही। आता जनता दुधखुळी नाही॥ यासाठीच मला काम करायचे। आता तु माझ्या साथीला यायचे ॥ या श्वासावर तुझाच अधिकार। आता तरी समजून घ्या सरकार ॥ हा जीव या ऋणातून मुक्त करावा । म्हणून आयुष्याची गाडी हळू चालवा॥ रचनाकार:आहेर वा.र.नासिक बी.ई.एमआयई.बीओई  ९९५८७८२९८२