व्यथा गुरुजींची

 


व्यथा गुरुजींची 

घंटा वाजली, शाळा सुटली 

पोरं दंगा करत घरी पळाली 

खडूची धुळ झटकली पंचाने 

गुरूजींनी घाम पुसला रुमालाने 

 घशाची तहान भागवली पाण्याने 

आठी पडली कामाच्या यादीने  

रात्रीचे साक्षरता वर्ग सुरु करा 

जनगणना करा,कुष्ठरोग्यांची यादी करा 

मासिक तक्ते, हजेरीपट भरा 

सरपंचाच्या मुलाची घ्या शिकवणी

हेडमास्तरची ऐकताच दटावणी 

आमचे आदर्श साने गुरूजी चितळेमास्तर, हिरवे गुरुजी 

निकाल आमचा शंभर टक्के 

सातव्या वेतनाने आम्ही पक्के

नाठाळा करितो आम्ही सरळ 

ऐकतो बरळ, परि वागतो करळ 

आम्हीच सांदिपनी अन वशिष्ठ 

मायबापानंतर आम्हीच श्रेष्ठ 

रचनाकार:आहेर वा.र.नासिक 

9958782982

Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS