|| माझे जीवन कार्य||
|| माझे जीवन कार्य|| जन क्षणभर म्हणाले कार्य काय| तुमचे कार्य काय, कार्य काय || तरी सुचेना मला मी केले काय| मग मनाचा मागोवा घेतलाय||१|| मी लव्हाळा पुरात वाचलेला | सुरुवात केली पुन्हा जगण्याला || धरतीवर तृणांकूर फुलविला| असेच वारे वाहत पुढती जाय||२|| मशागतीने शेतं पिकले| आनंदाने नदीनाले वाहिले || ना काळजी ना चिंता मज क्षणभर | जणूजळीबसेऔदुंबर टाकूनि पाय||३|| ना सगेसोयरे मदतीला आले| ते सर्व उठले बसले खिदळले।| पुन्हा आपल्या कामी लागले। माझे त्यात काय नुकसान नाय ।।४|| थोर पुरुष दुनियेत होऊन गेलेय | जग रहाटीला वळण लावलेय || श्रमिकांची मिळकत वाढलीय त्यात माझा खारीचा वाटा हाय||५|| या जगाला आनंदाने भरावे| मोहात कुणाच्या न गुंतावे || मनाने सत्शील माणूस व्हावे | जगण्यास आसरा देई माय||६|| आ aaहेर वाळू रघुनाथ नाशिक