पैसापुराण
*पैसापुराण* कठीण समयास कोण करी काम| येईल का धावून भगवान राम|| दाम करी काम बीबी करी सलाम | दामुजीला सर्व करती रामराम ||१|| कुबेर नगरी पुण्यभूमी पवित्र | तेथे नांदतोय धनराजा सुपुत्र|| तयास आठविता महापुण्यराशी | नमस्कार माझा त्याश्री धनराजाशी||२|| जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूच शोधून पाहे|| बाकी सर्व प्रवाहपतित आहे | रूपया शिवाय कोण मोठं आहे ||३|| ना नेता ना ईश्वर ना संत | तोच मोठा ज्याची आहे पत || करा दंगा, काढा कुरापत | कायदा पडेल खितपत ||४|| पैसा फेकून बघत बसा तमाशा | करतो दारू गांजा चरसची नशा || फेका पैसा न सजा करा बदमाशा| पैसे नसतील ना तर मारा माशा ||५|| म्हणती पैशापुढे सारे लहान | खरंच का पैसा हाच भगवान || कंगालाचा पैशातच आहे प्राण | पैशाने देवादारी मिळतो मान||६|| आमदणी अठ्ठणी खर्चा रुपया,| कोणीही असं करु नका कृपया || तेव्हा वापरा पैसा काटकसरीनं | इति सकल पैसा पुराण संपन्न ||७|| रचनाकार: आहेर वाळू रघुना थ नाशिक (बीई एमआयई बीओई)९९५८७८२९८२