पैसापुराण

 *पैसापुराण*

कठीण समयास कोण करी काम|

येईल का धावून भगवान  राम||

दाम करी काम बीबी करी सलाम |

दामुजीला  सर्व करती रामराम ||१||


कुबेर नगरी पुण्यभूमी पवित्र |

तेथे नांदतोय धनराजा सुपुत्र||

तयास आठविता महापुण्यराशी |

नमस्कार माझा त्याश्री धनराजाशी||२||


जगी सर्व सुखी असा कोण आहे |

विचारी मना तूच शोधून पाहे||

बाकी सर्व प्रवाहपतित आहे |

रूपया शिवाय कोण मोठं आहे ||३||


ना नेता ना ईश्वर ना संत |

तोच मोठा ज्याची आहे पत ||

करा दंगा, काढा कुरापत |

  कायदा पडेल खितपत ||४||


पैसा फेकून बघत बसा तमाशा |

करतो दारू गांजा  चरसची नशा ||

फेका पैसा न सजा करा बदमाशा|

पैसे नसतील ना  तर मारा माशा ||५||


म्हणती पैशापुढे सारे लहान |

खरंच का पैसा हाच भगवान ||

कंगालाचा पैशातच आहे  प्राण |

पैशाने देवादारी मिळतो मान||६||


आमदणी अठ्ठणी खर्चा रुपया,|

कोणीही असं करु नका  कृपया ||

तेव्हा वापरा पैसा काटकसरीनं |

इति सकल पैसा पुराण संपन्न ||७||


रचनाकार: आहेर वाळू रघुना

थ नाशिक 

(बीई एमआयई बीओई)९९५८७८२९८२


Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS