Posts

Showing posts from July, 2022

विना सहकार नाही उध्दार। 

 म्हण आहे  विना सहकार नाही उध्दार। सहकारी कारखानदारीचा मुळ विचार।।  त्यातून पुढे जन्मला आपला स्वाहाकार।   मग  झाला  हो सगळीकडे हाहाकार।।  अपप्रवृत्ती वाढल्या,प्रगती  खुंटली  । सरकारने साखरेच्या एमएसपी आणि  ऊसाची एफआरपी  नाही जोडली।। पीएफ भरला नाही,कर्ज व्याज नाही भरले । त्याने कारखाने  आजारी पडले।।  आणि गेले बँकेच्या  ताब्यात । शेतकरी  हवालदिल, कामगार देशोधडी।।  निम्मी  कारखानदारी झाली खाजगी । निम्मी राहिली सहकारी अन सरकारी ।। आता  सरकारने जोडली साखरेची एमएसपी आणि  ऊसाची एफआरपी । इथेनॉलचा चिराग दिला हाती ।। कारखान्यांचे भविष्य इथेनॉल हाती । बगॅसचे  उपपदार्थ साखर उद्योग उध्दारी।।  जास्त  रिकव्हरीचा ऊस लागवड करा । आधुनिकीकरणआणिऑटोमेशनकरा।।     येईल  कामगार, शेतकऱ्यांत समाधान। पुन्हा म्हणू विना सहकार नाही उध्दार।।