|| हीच खरी दिवाळी अन् पाडवा||
|| हीच खरी दिवाळी अन् पाडवा|| आली दिवाळी,गरीबाघरी आली दिवाळी परि दौलतीची तर नित चालते दिवाळी आनंदे बहरली झोपडी चंद्रमौळी सडासमार्जन करूनि काढली रांगोळी ||१|| रेखाटली दारी लक्ष्मीची पाऊले वसुबारसेला गोधन पुजले धनतेरसेला धन्वंतरी पुजले नरक चतुर्दशीला शेणाचे सैन्य केले||२|| लावले आकाशदिवे अन झेंडूच्या माळा दिवाळीला घरी लक्ष्मी येईल बाळा हीच खरी दिवाळी अन् पाडवा|| आली दिवाळी,गरीबाघरी आली दिवाळी परि दौलतीची तर नित चालते दिवाळी आनंदे बहरली झोपडी चंद्रमौळी सडासमार्जन करूनि काढली रांगोळी ||१|| रेखाटली दारी लक्ष्मीची पाऊले वसुबारसेला गोधन पुजले धनतेरसेला धन्वंतरी पुजले नरक चतुर्दशीला शेणाचे सैन्य केले||२|| लावले आकाशदिवे अन झेंडूच्या माळा दिवाळीला घरी लक्ष्मी येईल बाळा केला गोडधोड नैवेद्य पुरणपोळी निघे दिवाळं, तरी साजरी केली दिवाळी ||३|| येई नवे धान,नव वरीसं होई पावन बाईल म्हणे धनी माझा सत्यवान वाजती फटाके, दणाणले आसमंत जरी असलो गरीब तरी मन श्रीमंत ||४|| बहीण येई घरा भाऊबीजेच्या सणाला ओवाळते आनंदाने बहीण भावाला...