मी मॅट्रीक पास झालो. तो जानेवारी महिन्याचा पहिला शनिवार होता. नाताळची सुट्टी संपून शाळा नुकतीच सुरु झाली होती. शनिवारी सकाळची शाळा असायची .आज जरा लवकरच मी सकाळी शाळेसाठी निघालो. मी अकरावीच्या वर्गात होतो.आज शाळेत पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, म्हणून मनाला हूर हूर लागली होती. प्रार्थना होऊन वर्ग सुरू झाले. वर्गशिक्षक श्री. शिंदेसरांनी हजेरीपट घेतला. नंतर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला. सरांनी माझे खूप खूप अभिनंदन केले, कारण माझा वर्गात पहिला नंबर आला होता. सर्व मुलांमध्ये एकमेकांना शुभेच्छा देत मार्कांची विचारपूस सुरू झाली. इतक्यात शाळेचा खूळे शिपाई वर्गात नोटीस घेऊन आला. सरांनी नोटीस वाचून झाल्यावर सोमवारीच बोर्ड परिक्षेचा फाॅर्म भरावयाचा आहे, तरी सर्वांनी फाॅर्म फी तेवीस रूपये घेऊन येण्याची सूचनाकेली. नंतर दोन तीन तास झाले आणि शाळा सुटली. सर्व मुले लगबगीने घरी निघाले पण मी मात्र रेंगाळत रूपये तेवीस आणायचे कसे याचा विचार करत चालु लागलो. कारण घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडीलांना दारू पिण्याचे व्यसन होते आई दररोज शेतमजुरी करून मा...
Posts
Showing posts from October, 2021