आदर्श शिक्षक
- श्री.पी.आर.आहिरेसर यांनी मुख्याध्यापक म्हणून जनता विद्यालय मुखेड येथे १० वर्षे काम केले. त्यांच्या कर्तृत्वाने तेथे गेल्यावर त्यांचे स्मरण झाल्याशिवाय राहात नाही.आज आणि तेंव्हा अशी न कळत तुलनाही होते. मनात विनम्र भाव निर्माण होतो. आमच्या मुखेड गावी १९६७ला मविप्र समाज नासिक यांचे वतीने नवीन हायस्कूलचा ८वीचा वर्ग सुरू झाला होता. मे१९६८ मध्ये मी ७वीची परीक्षा लासलगाव केंद्रातून २नंबरने पास झालो.मला ८वीला प्रवेश मिळाला,तेव्हा कळाले की,नवीन हेडसर म्हणून श्री.पी.आर.आहिरेसर आलेले आहेत. करारी चेहरा,उंच,सावळ्या रंगाचे सर,पहाता क्षणीच आदरयुक्त भीति मनात निर्माण झाली आणि ती पुढे कायम टिकून राहिली.सरांनी ८वीला मराठी आणि इंग्लीश विषय शिकविले. दर शनिवारी इंग्लीशच्या तासाला नवीन शब्द पाठ करून घेणे, इंग्लीश शब्दांच्या भेंड्या खेळणे, यामुळे इंग्लीश पक्के झाले आणि A,E,I,O,U,X and Y या अक्षरांनी सुरूवात होणारे शब्द आजही पाठ आहेत. मी वर्गातील हुशार विद्यार्थी म्हणून मला सरांचे अधिक प्रेम आणि सहवास लाभला. मी सरांचे घरी रोज संध्याकाळी ६ नंतर पेपर वाचण्यासाठी आणि रेडिओवरील बातम्या ऐकण्यासाठी ...