ऊसाची मशागत

 ऊसाची मशागत 

ऊसाची लागणं होऊ दे गं सुनबाई 

मग जा आपुल्या माहेरा

ऊसाची लागणं झालीहो सासुबाई 

आता तरी जाऊ का माहेरा ॥१॥

ऊसाची निंदणी होऊ दे ग सुनबाई

मग जा तू आपुल्या माहेरा 

ऊसाची निंदणी झाली हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा ॥२॥

 ऊसाची नोंदणी होऊ दे गं सुनबाई

मग जा आपुल्या माहेरा

ऊसाची नोंदणी झाली हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा ॥३॥

तागाची बेवड होऊ दे गं सुनबाई

मग जा आपुल्या माहेरा

 तागाची बेवड झाली हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा ॥४॥

बाळबांधणी ,कटभरणी कर गं सुनबाई

मग जा आपुल्या माहेरा

बाळबांधणी ,कटभरणी केली हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा ॥५॥

ऊस संजीवनी अन जीवामृत ऊसाला दे गं सुनबाई,

मग जा आपुल्या माहेरा

ऊस संजीवनी अन जीवामृतदिले हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा ॥६॥

ऊसात पाचट पसरवं ग सुनबाई

मग जा तू आपल्या माहेरा

 ऊसात पाचट पसरवलं हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा||७||

पाणी बंदची नोटीस येऊ दे ग सुनबाई

मग जा तू आपल्या माहेरा

पाणी बंदची नोटीस आलीहो सासुबाई 

आता तरी जाऊ का माहेरा ॥८॥

ऊसाची तोड होऊ दे ग सुनबाई

मग जा तू आपल्या माहेरा माहेरा

ऊसाचीतोड झाली हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा ॥९॥

आणा फणी, घाला वेणी, जाऊ द्या राणी माहेरा 

आणली फणी, घातली वेणी, गेली राणी माहेरा सुनेने लिहिली ऊसकहानी जाण्यास माहेरा॥१०॥

रचनाकार:आहेर वा.र.नासिक बी.ई.एमआयई.बीओई 

9958782982 

Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS