पुस्तकावर बोलू काही यासंदर्भातील १११व्या कार्यक्रमात श्री वाळू आहेर यांचे अंतरीचे बोल या काव्यसंग्रहावर व्याख्यान संपन्न झाले.


गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक चे अध्यक्ष,
माणूस मित्र श्री.सुरेश पवार सर*, यांच्या पुस्तकावर बोलू काही  या १११व्या कार्यक्रमात  कवी श्री.वाळू रघुनाथ आहेर
(बीई. एमआयई. बीओई.)नाशिक यांचे
त्यांचा  प्रकाशित झालेला कविता संग्रह
"*अंतरीचे बोल*" या विषयावर व्याख्यान आज दिनांक ७/३/२०२५रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे संध्याकाळी सहा वाजता झाले.अधयक्षस्थानी
कवयित्रीसौ.पाटीलमॅडमहोत्या.सुरूवातीलाश्री.
बाळासाहब गिरी यांनी स्वागत केले आणि श्री.चिंधडे वकील यांनी श्री.आहेर यांचा सन्मान केला.त्यानंतर श्री.आहेर यांनी त्यांच्या ओघवती भाषणात अंतरीचे बोल या काव्यसंग्रहात  सर्व कविता आपल्या जीवनात आलेल्या अनुभवावरून लिहिलेल्या आहेत असे सांगितले.त्यात  मुखपृष्ठावर दर्शविल्याप्रमाणे परमेश्वर,आई, सामान्य माणसाच्या व्यथा आणि साखर उद्योग या चार महत्त्वाचे विषयांवर कविता लिहिल्या आहेत.असा मी असामी, माझे जीवन कार्य, हुंकार,मी स्वप्नात ऊस लावला,आई, हरीनामाचा महिमा अशा विविध कवितांच्या ओळी सादर केल्या.सोबत आपल्या आयुष्याचा जीवनपट या कवितांचा आधार घेऊन मांडला.गरीबांच्या जीवनात डोकावून त्यांचे जीवनमानउंचावण्यासाठीप्रयत्नकेला.आजपर्यंत
चाळीस एक टेक्निकल निबंध लिहून प्रसिद्ध केले आहे.मराठीतही लेखन केले आहे.कार्यक्रमास सर्वश्री नानासाहेब बोरस्ते माजी आमदार, कवी बाळासाहेब गिरी,ॲडव्होकेट श्री  व सौ चिधडे, कवी संजय आहेर, राजेश जाधव,चारूदत्त अहिरे, केशवराव पवार,बी एम पवार,प्रा. नागरगोजे सर,बबन वाघ , ईपीएफ जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि सदस्य, सुरेंद्र पगार,सौ.छाया आहेर, सुप्रिया आहेर,डॉ.रोहिणी कापसे आदी रसिक उपस्थित होते . शेवटी श्री.चारुदत्त अहिरे आणि संजय आहेर या भाग्यवान रसिकांचा पुस्तक भेट देऊन श्री. वाळू आहेर आणि सौ.पाटील मॅडम यांनी सत्कार केला.कवी संजय आहेर यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला. 

Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS