|| माझे जीवन कार्य||
|| माझे जीवन कार्य||
जन क्षणभर म्हणाले कार्य काय|
तुमचे कार्य काय, कार्य काय ||
तरी सुचेना मला मी केले काय|
मग मनाचा मागोवा घेतलाय||१||
मी लव्हाळा पुरात वाचलेला |
सुरुवात केली पुन्हा जगण्याला ||
धरतीवर तृणांकूर फुलविला|
असेच वारे वाहत पुढती जाय||२||
मशागतीने शेतं पिकले|
आनंदाने नदीनाले वाहिले ||
ना काळजी ना चिंता मज क्षणभर |
जणूजळीबसेऔदुंबर टाकूनि पाय||३||
ना सगेसोयरे मदतीला आले|
ते सर्व उठले बसले खिदळले।|
पुन्हा आपल्या कामी लागले।
माझे त्यात काय नुकसान नाय ।।४||
थोर पुरुष दुनियेत होऊन गेलेय |
जग रहाटीला वळण लावलेय ||
श्रमिकांची मिळकत वाढलीय
त्यात माझा खारीचा वाटा हाय||५||
या जगाला आनंदाने भरावे|
मोहात कुणाच्या न गुंतावे ||
मनाने सत्शील माणूस व्हावे |
जगण्यास आसरा देई माय||६||
आहेर वाळू रघुनाथ नाशिक
Comments
Post a Comment