ऊसाचा संसार

ऊसाचा संसार ऊसाला झाली दोन दोन पोरं, मोठा मुलगा ‘गुळ’ अन् धाकटी मुलगी ‘साखर’ साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर, गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर साखर तशी स्वभावाला गोड, तिच्यात उणेपणा शोधणं अवघड गुळ मात्र स्वभावाला चिकट, समोर दिसला की ईतरांना वाटे संकट साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळुन जाई, गुळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड, गुळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता ‘ओबडधोबड’ साखरेचे रव्यावर प्रेम जडले, बापाने लगेच् दोघांचे लग्नच् लावुन टाकले तीला झाला एक मुलगा दिसायला होता तो गोरागोरा, यथावकाश बारसे झाले, नांव ठेवले ‘शिरा’ ऊसाला आता काळजी वाटु लागली गुळाची, त्याच्या साठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची ? ऊसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग, सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग बर्‍याच मुली पाहील्या, कोणी त्याला पसंत करीना, काळजी वाटे ऊसाला रात्री झोप येईना ऊसाला मित्र एक होता, नांव त्याचे तूप त्याने प्रयत्न केले खुप, अन् ऊसाला आला हुरुप त्याने मुलगी सुचविली गव्हाची, जी दिसायला होती बेत्ताची धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे, होते ऊसाच्या तोलामोलाचे, ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे अंगाने ती होती लठ्ठ नी जाडजुड, रुपाला साजेसे, नांंव होते तीचे ‘भरड गव्हाला मुलीच्या रुपाची होती कल्पना, तो कशाला करतो नसत्या वल्गना ? होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले, लग्न जमले अन् सारे तयारीला लागले किचन ओटा झाला, लग्नासाठी बुक, स्वयंपाकघर पण सजविले खुप ‘भरड’ ला तूप कढईत घेउन गेले, तेथेच् तीचे खरपुस मेक-अप पण केले भरपुर लाजली ‘भरड’, अन् झाली गुलाबी, गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली ‘शराबी’ लग्नाची तयारी पहायला आलेले दुध सुद्धा कढईत शिरले, अन् हळुच् त्याने गुळाला कढईत पाचारीले गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश मनाने दगड असलेल्या भावनाशुन्य गुळाला, ‘भरडी’ चे रुप पाहुन, वेळ नाही लागला पाघळायला काजु बदाम किसमीच्या पडल्या अक्षता, कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी, थाटामाटात बारसे झाले, नांव ठेवले लापशी . रचना - आहेर वा.र .नासिक

Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS