हो म्हणूनच मी आहे घाईत

हो म्हणूनच मी आहे घाईत।। सेवानिवृत्तीच्या दिवशी मला सजवला जसा सजवता घाण्याचा बैल पोळ्याला मला हारशालीसह घरी पोहोचविला सोबत पेन्शन अन मोठा चेक दिला आज मी माझी सरलेली वर्षे मोजली आणि अचानक माझ्या लक्षात आलं अरेच्या जेवढं माझं जगून झालंय त्यापेक्षा कमीच आयुष्य उरलंय जेव्हा लहान मुलं आवडीने खाऊ खाते अन मग दिसतंय थोडाच खाऊ उरला तेव्हा मुलं मन लावून खाऊ खाते मलाही तसंच वाटतंउरलेल्या आयुष्याचं कोणताही विधिनिषेध बाळगणार नाही या पोकळ चर्चांना आता मलावेळ नाही वय वाढले म्हणजे बुध्दी वाढत नाही अशांशी वाद घालायची इच्छा नाही मला खऱ्याखुऱ्या माणसांत जगायचंय जी स्वतःच्या चुकांवर हसतात अन विजयानेही नम्र होतात नेहमीच दुस-याला सावरतात आपल्या कर्माची जबाबदारी घेतात दुस-याच्या ह्रदयाला स्पर्श करतात आयुष्याचे फटकारेही झेलतात अन पवित्र स्पर्शाने मोठेपण पेरतात मला आयुष्य परिपूर्ण जगायचंय जे उत्कटतेने,प्रगल्भतेने भरलंय त्यासाठी माझ्याकडे उरलेली जराशीही वेळ मलाफुकट घालवायची नाही माझं आता एकच ध्येय आहे प्रेमीजनांसोबत विवेक बुध्दीने जगायचंय शांततेने,समाधानाने हो त्यामुळेच मी आहे घाईत दोस्तानो आपली दोन आयुष्ये असतात दुसरे आयुष्य सुरू होताच कळतं जगायचं थोडंच आयुष्य उरलंय हो म्हणूनच मी आहे घाईत रचना:आहेर वा.र. नासिक 9958782982

Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS