विना सहकार नाही उध्दार।
म्हण आहे विना सहकार नाही उध्दार। सहकारी कारखानदारीचा मुळ विचार।।
त्यातून पुढे जन्मला आपला स्वाहाकार।
मग झाला हो सगळीकडे हाहाकार।।
अपप्रवृत्ती वाढल्या,प्रगती खुंटली ।
सरकारने साखरेच्या एमएसपी आणि ऊसाची एफआरपी नाही जोडली।।
पीएफ भरला नाही,कर्ज व्याज नाही भरले ।
त्याने कारखाने आजारी पडले।।
आणि गेले बँकेच्या ताब्यात ।
शेतकरी हवालदिल, कामगार देशोधडी।।
निम्मी कारखानदारी झाली खाजगी ।
निम्मी राहिली सहकारी अन सरकारी ।।
आता सरकारने जोडली साखरेची एमएसपी आणि ऊसाची एफआरपी ।
इथेनॉलचा चिराग दिला हाती ।।
कारखान्यांचे भविष्य इथेनॉल हाती ।
बगॅसचे उपपदार्थ साखर उद्योग उध्दारी।।
जास्त रिकव्हरीचा ऊस लागवड करा ।
आधुनिकीकरणआणिऑटोमेशनकरा।।
येईल कामगार, शेतकऱ्यांत समाधान।
पुन्हा म्हणू विना सहकार नाही उध्दार।।
Comments
Post a Comment