।।धाव घेई विठूराया आता चालू नको मंद।।
।।धाव घेई विठूराया आता चालू नको मंद।।
राऊळी मंदिरीबडवे मज लुटती
गंगेवरी उपाध्ये कर्मकांड करविती
अजाबलीसाठी मांत्रिकही कष्टविती
तयानेच कंठ माझा सुकला
धाव घेई विठूराया आता चालू नको मंद।।
दुकानदार मापात पाप करि
कापडात मिटराचा वार करि
तेलात किलोचा शेर करि
तयानेच कंठ माझा सुकला
धाव घेई विठूरायाआता चालू नको मंद।।
विहीर तयार होई फक्त कागदावरि
रस्ते दिसती फक्त फायलीवरि
टेबलाखालून चाले सर्व व्यवहार
तयानेच कंठ माझा सुकला
धाव घेई विठूरायाआता चालू नको मंद।।
सातबारावर तलाठ्याला अडचण
घरासाठी ग्रामसेवकाला अडचण
शेती कर्जाला सचिवाला अडचण
तयानेच कंठ माझा सुकला
धाव घेई विठूरायाआता चालू नको मंद।।
बालवाडीत प्रवेश महाग फार
मास्तर कलंदर ,शाळेत पोरं बेजार
ऑनलाईन शिक्षणाने काॅलेज ओसाड
तयानेच कंठ माझा सुकला
धाव घेई विठूरायाआता चालू नको मंद।।
पक्ष सगळे सारखेच, त्यानं राजकारण गेलं चुलीत
पेट्रोल गेलं वर ,कपाशी आली खाली
विकासाचा बोलबाला, आपण जगात तिसरे
मजूर किलोभर ज्वारीसाठी रोज हात पसरे
तयानेच कंठ माझा सुकला
।।धाव घेई विठूराया आता चालू नको मंद।।
रचना - आहेर वा.र .नासिक
9958782982
Comments
Post a Comment