स्तुतीसुमने
स्तुतीसुमने।।
पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठला ।
देवांचा शिरोमणी हा एकला ।।
गळा वैजयंतीमाला रूळतसे ।
कंठी कौस्तुभ मणी विराजीतसे ।।
मकरकुंडले शोभति श्रवणी।
तुझे पायीची सुखावली धरणी ।।
शिरी मुकुट शोभे फाकली प्रभा ।
वामांगी रखुमाई दिव्य तयाची शोभा ।।
कासे पितांबर कस्तूर ललाटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे ठाकति ।।
भीमा आणि चंद्रभागा ।
तुझ्या चरणीच्या गंगा।।
उध्दव अक्रूरउभे भूमंडळी ।
हजेरी लावती संतमंडळी ।।
ज्ञाना तुका गोरा चोखा बंका ।
सोपान मुक्ता जनी नामा एका ।।
सम चरण ठेवुनिया विटेवरी ।
उभा पांडुरंग ठेवुनिया कर कटेवरी ।।
झाली तयाला युगे अठ्ठावीस ।
पुंडलिका भेटीसाठी हा प्रयास ।।
रचनाकार:आहेर वा.र.नासिक 9958782982
Comments
Post a Comment