सुस्वागतम
सुस्वागतम -ऑफ सिझन२३
गळीत संपले,संपला आता सिझन।
करा प्राथमिक सफाई झटकन।।
केनयार्ड अन् बगॅस यार्डसाफ करा ।
सर्व केरकचरा कंपोस्ट मध्ये भरा ।।
चिमणी- बाॅयलरची राख साफ करा ।
हाॅपर एलेव्हेटर ग्रेडर साफ करा।।
सायलो अन् कैची काॅलम साफ करा।
शुगर हाऊसचीसाखर गोळा करा ।।
क्रिस्टलायझर,सिरप टाक्या खालीकरा।
केनकॅरिअर,मील धुऊन सफाई करा।।
बाॅयलींग हाऊस मशिनरी धुऊन काढा ।
टर्बाईन,गिअर बॉक्स चे ऑईल काढा।।
बाॅयलरकेमिकल करा ट्युबसफाईकरा।
स्प्रे इंजेक्शन इटीपी त्वरित साफकरा।।
गॅस, सिरप ,स्प्रे पाईप खोला भराभरा।
एनडीटी टेस्ट वॉटर टेस्ट लवकर करा।।
खराब पाईप बेंड व्हॉल बाजूला करा।
नवीन मालाचे मागणीपत्र सादर करा।।
याप्रमाणे ऑफ सिझनची तयारी करा ।
सिझन२३/२४चा ध्यासधरा ध्यासधरा।।
रचनाकार :वा.र.आहेर नासिक.
९९५८७८२९८२
Comments
Post a Comment