दमलास काय बा विठ्ठला तु।।
दमलास काय बा विठ्ठला तु।।
जनी नामयाची दासी,करि मदत तिजशी।
कबीराने जाणिले जनाबाईशी
जनीचे दळण दळिता, गोव-या थापता ।
दमलास काय बा विठ्ठला तु।।1।।
कबीर दासाचे शेले विणिशी ।
रोहिदासाचे जोडे बनविशी ।
भक्तांचिये कामं करता करता।
दमलास काय बा विठ्ठला तु।।2।।
रेड्यामुखी वेद वदविले ज्ञानासाठी ।
भिंत चालविली मुक्ताईसाठी ।
संन्याशाच्या पोरांना मदत देता देता ।
दमलास काय बा विठ्ठला तु।।3।।
नामयाचे लाड पुरवितो ।
दही भाताचा नैवेद्य खातो ।
नामयाला गुरू देता देता ।
दमलास काय बा विठ्ठला तु।।4।।
व्यापारी तुकोबाची सचोटी टिकविशी ।
लोक कल्याणाचे अभंग रचविशी ।
इंद्रायणीत गाथा बुडू न देतांना ।
दमलास काय बा विठ्ठला तु।।5।।
आम्हीही करितो तुझी आराधना ।
आवरा दुर्जना, अभय दे सज्जना।
समचरण पाहू या तुझे विटेवरी ।
दमलास काय बा विठ्ठला तु।।6।।
आहेर वा.र. नासिक
9958782982
Comments
Post a Comment