Posts

|| माझे जीवन कार्य||

 || माझे जीवन कार्य|| जन क्षणभर म्हणाले कार्य काय| तुमचे कार्य काय, कार्य काय || तरी सुचेना मला मी केले काय|   मग मनाचा मागोवा घेतलाय||१||   मी लव्हाळा पुरात वाचलेला | सुरुवात केली पुन्हा जगण्याला || धरतीवर तृणांकूर फुलविला| असेच वारे वाहत पुढती जाय||२|| मशागतीने शेतं पिकले|   आनंदाने नदीनाले वाहिले || ना काळजी ना चिंता मज क्षणभर | जणूजळीबसेऔदुंबर टाकूनि पाय||३|| ना सगेसोयरे मदतीला आले| ते सर्व उठले बसले खिदळले।|  पुन्हा आपल्या कामी लागले। माझे त्यात काय नुकसान नाय ।।४|| थोर पुरुष दुनियेत होऊन गेलेय |   जग रहाटीला वळण लावलेय || श्रमिकांची मिळकत वाढलीय  त्यात माझा खारीचा वाटा हाय||५|| या जगाला आनंदाने भरावे|   मोहात कुणाच्या न गुंतावे || मनाने सत्शील माणूस व्हावे | जगण्यास आसरा देई माय||६|| आ aaहेर वाळू रघुनाथ नाशिक
  पुस्तकावर बोलू काही यासंदर्भातील १११व्या कार्यक्रमात श्री वाळू आहेर यांचे अंतरीचे बोल या काव्यसंग्रहावर व्याख्यान संपन्न झाले. गिरणा गौरव प्रतिष्ठान नाशिक चे अध्यक्ष, माणूस मित्र श्री.सुरेश पवार सर*, यांच्या पुस्तकावर बोलू काही  या १११व्या कार्यक्रमात  कवी श्री.वाळू रघुनाथ आहेर (बीई. एमआयई. बीओई.)नाशिक यांचे त्यांचा  प्रकाशित झालेला कविता संग्रह "*अंतरीचे बोल*" या विषयावर व्याख्यान आज दिनांक ७/३/२०२५रोजी हुतात्मा स्मारक नाशिक येथे संध्याकाळी सहा वाजता झाले.अधयक्षस्थानी कवयित्रीसौ.पाटीलमॅडमहोत्या.सु रूवातीलाश्री. बाळासाहब गिरी यांनी स्वागत केले आणि श्री.चिंधडे वकील यांनी श्री.आहेर यांचा सन्मान केला.त्यानंतर श्री.आहेर यांनी त्यांच्या ओघवती भाषणात अंतरीचे बोल या काव्यसंग्रहात  सर्व कविता आपल्या जीवनात आलेल्या अनुभवावरून लिहिलेल्या आहेत असे सांगितले.त्यात  मुखपृष्ठावर दर्शविल्याप्रमाणे परमेश्वर,आई, सामान्य माणसाच्या व्यथा आणि साखर उद्योग या चार महत्त्वाचे विषयांवर कविता लिहिल्या आहेत.असा मी असामी, माझे जीवन कार्य, हुंकार,मी स्वप्नात ऊस लावला,आई, हरीनामाचा महि...

||असं जगायचं राहून गेले ||

 ||असं जगायचं राहून गेले || अस्मादिक  आज्ञाधारक फार   कायम पहिला असा हुशार  होता गरीबीचा रोष अपार  उनाडक्या करणे राहून गेले||१|| कॉलेजातही होतो शिस्तशीर  नव्हं तसा गबाळा बेफिकीर  होतो कायमच आटोपशीर  लाईन मारायचं राहून गेले||२|| नोकरीत नाही केला आराम कामामध्येच सापडला राम कायम मिळाला वाजवी दाम चुगल्या करायचं राहुन गेले||३|| होईल तेवढी केली मदत नाही काढली तयाची वरात  नियोजन  शस्त्र होते हातात  कुचाळक्या करणे राहुन गेले||४|| वाणी सरळसोटच राहिली भल्याची बु-याची पारख केली  सालस वृत्ती अंगी बाळगली नथीतलेच तीर  राहून गेले||५||  डोळस श्रद्धा देवाला  वाहिली  मदिरालये नाही धुंडाळली  अबोलपणाची धग सोसली  भामटे  वागायचे राहून गेले||६|| रचनाकार: आहेर वाळू रघुनाथ नाशिक. (बीई एमआयई बीओई)

पैसापुराण

 *पैसापुराण* कठीण समयास कोण करी काम| येईल का धावून भगवान  राम|| दाम करी काम बीबी करी सलाम | दामुजीला  सर्व करती रामराम ||१|| कुबेर नगरी पुण्यभूमी पवित्र | तेथे नांदतोय धनराजा सुपुत्र|| तयास आठविता महापुण्यराशी | नमस्कार माझा त्याश्री धनराजाशी||२|| जगी सर्व सुखी असा कोण आहे | विचारी मना तूच शोधून पाहे|| बाकी सर्व प्रवाहपतित आहे | रूपया शिवाय कोण मोठं आहे ||३|| ना नेता ना ईश्वर ना संत | तोच मोठा ज्याची आहे पत || करा दंगा, काढा कुरापत |   कायदा पडेल खितपत ||४|| पैसा फेकून बघत बसा तमाशा | करतो दारू गांजा  चरसची नशा || फेका पैसा न सजा करा बदमाशा| पैसे नसतील ना  तर मारा माशा ||५|| म्हणती पैशापुढे सारे लहान | खरंच का पैसा हाच भगवान || कंगालाचा पैशातच आहे  प्राण | पैशाने देवादारी मिळतो मान||६|| आमदणी अठ्ठणी खर्चा रुपया,| कोणीही असं करु नका  कृपया || तेव्हा वापरा पैसा काटकसरीनं | इति सकल पैसा पुराण संपन्न ||७|| रचनाकार: आहेर वाळू रघुना थ नाशिक  (बीई एमआयई बीओई)९९५८७८२९८२

|| माझे जीवन कार्य||

 || माझे जीवन कार्य|| जन क्षणभर म्हणाले कार्य काय| तुमचे कार्य काय, कार्य काय || तरी सुचेना मला मी केले काय|   मग मनाचा मागोवा  घेतलाय||१||   मी लव्हाळा पुरात वाचलेला | सुरुवात केली पुन्हा जगण्याला || धरतीवर तृणांकूर फुलविला| असेच वारे  वाहत पुढती जाय||२|| मशागतीने शेतं पिकले|   आनंदाने नदीनाले वाहिले || ना काळजी ना चिंता मज क्षणभर | जणूजळीबसेऔदुंबर टाकूनि पाय||३|| ना सगेसोयरे मदतीला आले| ते सर्व उठले बसले  खिदळले।|  पुन्हा आपल्या कामी लागले। माझे त्यात  काय नुकसान नाय ।।४|| थोर पुरुष  दुनियेत होऊन गेलेय |   जग रहाटीला वळण लावलेय || श्रमिकांची मिळकत वाढलीय  त्यात माझा खारीचा वाटा हाय||५|| या जगाला आनंदाने भरावे|   मोहात कुणाच्या न गुंतावे || मनाने सत्शील माणूस व्हावे | जगण्यास आसरा देई माय||६|| आहेर वाळू रघुनाथ नाशिक 

|| हीच खरी दिवाळी अन् पाडवा||

 || हीच खरी दिवाळी अन् पाडवा|| आली दिवाळी,गरीबाघरी आली दिवाळी परि दौलतीची तर नित चालते दिवाळी  आनंदे बहरली झोपडी चंद्रमौळी  सडासमार्जन करूनि काढली रांगोळी ||१|| रेखाटली दारी लक्ष्मीची पाऊले वसुबारसेला गोधन पुजले  धनतेरसेला धन्वंतरी पुजले नरक चतुर्दशीला शेणाचे सैन्य केले||२|| लावले आकाशदिवे अन  झेंडूच्या माळा दिवाळीला घरी लक्ष्मी येईल बाळा हीच खरी दिवाळी अन् पाडवा|| आली दिवाळी,गरीबाघरी आली दिवाळी परि दौलतीची तर नित चालते दिवाळी  आनंदे बहरली झोपडी चंद्रमौळी  सडासमार्जन करूनि काढली रांगोळी ||१|| रेखाटली दारी लक्ष्मीची पाऊले वसुबारसेला गोधन पुजले  धनतेरसेला धन्वंतरी पुजले नरक चतुर्दशीला शेणाचे सैन्य केले||२|| लावले आकाशदिवे अन  झेंडूच्या माळा दिवाळीला घरी लक्ष्मी येईल बाळा केला गोडधोड नैवेद्य पुरणपोळी  निघे दिवाळं, तरी साजरी केली दिवाळी ||३|| येई नवे धान,नव वरीसं होई पावन बाईल म्हणे धनी माझा सत्यवान  वाजती फटाके, दणाणले आसमंत  जरी असलो गरीब तरी मन श्रीमंत ||४|| बहीण येई घरा भाऊबीजेच्या सणाला  ओवाळते  आनंदाने बहीण भावाला...

॥उध्दार पामराचा ॥

  ॥ उध्दार पामराचा ॥ लोंबती लक्क्तरे तयाचि, लाळही गळे  विपन्नावस्थेत उभा रस्त्यावर तो पामर बळे। नाही कुणास चिंता त्याच्या भुकेची नाही कुणास दया त्याच्या अपंगांची ॥१॥  रूपेरी दौलतीचे धनी वाकुल्या दाखवित   राजरोस पळती आलिशान गाडीत । पथिकांचेही गावीही नसे त्याचे आक्रीत   या नि:संग वृतीने आला तो जीव धोक्यात ॥२॥ सरकार दरबारात अर्ज त्याचा फायलीत  हलेना तो वजनाविना म्हणती ती जग रीत । रोज करि नमस्कार परि घडेना चमत्कार  आर्जविता नेत्यास तो टाकीतसे फुत्कार ॥३॥ बघुनि त्यास एकदा कळवळला एक दयावंत    उपचार करि बळे नेऊन पथिकाश्रमात । केशवपनाचा सोहळा झाला नवी वस्रे ल्याला   खुप दिवसांनी मिष्टान्न खाऊन तृप्त झाला ॥४॥   वेळीच कौशल्य मिळवून विणकामाचे   स्वहस्ते भरजरी शेला विणितसे रामाचे।  तयाचा झुकलेला माथा उन्नत झाला  जगी एका पामराचा उध्दार झाला ॥५॥ रचनाकार:आहेर वा.र.नासिक बी.ई.एमआयई.बीओई ९९५८७८२९८२