||असं जगायचं राहून गेले ||

 ||असं जगायचं राहून गेले ||

अस्मादिक  आज्ञाधारक फार

  कायम पहिला असा हुशार 

होता गरीबीचा रोष अपार 

उनाडक्या करणे राहून गेले||१||

कॉलेजातही होतो शिस्तशीर 

नव्हं तसा गबाळा बेफिकीर 

होतो कायमच आटोपशीर 

लाईन मारायचं राहून गेले||२||

नोकरीत नाही केला आराम

कामामध्येच सापडला राम

कायम मिळाला वाजवी दाम

चुगल्या करायचं राहुन गेले||३||

होईल तेवढी केली मदत

नाही काढली तयाची वरात 

नियोजन  शस्त्र होते हातात 

कुचाळक्या करणे राहुन गेले||४||

वाणी सरळसोटच राहिली

भल्याची बु-याची पारख केली 

सालस वृत्ती अंगी बाळगली

नथीतलेच तीर  राहून गेले||५|| 

डोळस श्रद्धा देवाला  वाहिली 

मदिरालये नाही धुंडाळली 

अबोलपणाची धग सोसली 

भामटे  वागायचे राहून गेले||६||

रचनाकार: आहेर वाळू रघुनाथ नाशिक. (बीई एमआयई बीओई)


Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS