Siddhi sugar

Siddhi-sugar news article

लातूर : अहमदपूर तालुक्यातील सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज येथे, ‘शून्य टक्के मिल बंद तास’ या विषयावर साखर उद्योगातील नामवंत सल्लागार आणि डीएसटीए, पुणेचे संचालक वा. र. आहेर यांनी मार्गदर्शन केले. ‘शून्य टक्के मिल बंद तास’चे लक्ष्य कसे साध्य करायचे याचा ‘कानमंत्र’ त्यांनी दिला.

‘एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” असा संकल्प सोडून आपण सांगितलेल्या टिप्सचा उपयोग केल्यास कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळते, असे आहेर यांनी विविध उदाहरणांसह सांगितले. “हायप्रेशर बॉयलरचे ऑपरेशन, मेंटेनन्स आणि सुरक्षितता, याविषयावरही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

उजना येथील मे. सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड, महेश नगरच्या कारखाना स्थळावर आहेर यांची कार्यशाळा पार पडली. साखर कारखान्याचे मार्गदर्शक मा.आ.बाबासाहेब पाटील यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली, आणि कार्यकारी संचालक अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर शंकर पिसाळ, जनरल मॅनेजर (तंत्र) के. व्ही. कावलगुडेकर, प्रोसेस सल्लागार सोमवंशी, डे. चिफ इंजिनिअर मुलानी साहेब, डे. चिफ केमिस्ट लकडे, परचेस ऑफिसर सावंत, सर्व इंजिनिअर, केमिस्ट आणि सर्व कारखाना कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत श्री. आहेर यांची ही कार्यशाळा झाली.

श्री. पाटील यांनी प्रास्ताविक करून, श्री. आहेर यांचा परिचय करून दिला आणि नंतर त्यांचा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पाटील यांनी सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS