ध्यास एकरी शंभर टन ऊसाचा

 

sunday-poem

धसकटं, खोडं काढली सारी वेचून 

टाकले शेणखत शेतात विखरून 

झालं शेत नांगरून, दुबार वखरून 

 अन झाली सहा फुटांवर सरी पाडून 

आणली एक डोळा रोपं 86032ची केली तयारी ऊसाच्या लागणीची

आंबोण देऊन रोपली एक डोळा रोपे

ड्रीपचे पाईप वापरून काम झाले सोपे 

केली नोंद कारखान्यावर शेतकीला 

बेवडं पेरले ताग धेंचा नत्र पुरवायला 

चार महिन्यांत केली बाळबांधणी

आठ महिन्यांनी केली कटभरणी 

दिले ऊस संजीवनी आणि जीवामृत

पाचट काढून पसरवले ऊसात 

चौदा महिन्यात आली पाणीबंद नोटीस 

झाली ऊसतोड देऊन पैशांची घुस 

ऊसाचे वजन आले एकरी शंभर टन 

 झाले मेहनतीचे चीज,भरून पावलं मन 

रचनाकार:आहेर वा.र.नासिक .

9958782982 



Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS