विघ्नहर ससाका लि महाराष्ट्र
दिनांक ७जुल्लै२३रोजी साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणे यांचे संचालक श्री.वा.र.आहेरसर यांचे।।"एकच ध्यास,एकच ध्यास" ।।
।।"शुन्य टक्के मील बंद तास"।।
आणि "हायप्रेशर बाॅयलर चे ऑपरेशन ,मेंटेनन्स आणि सुरक्षितता"याविषयावरील व्याख्यानश्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि.निवृती नगर,ता.जुन्नर जिल्हा- पुणे
या साखर कारखान्यावर संपन्न झाले.
साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय श्री.सत्यशील शेरकरसाहेब यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली, आणि श्री .घुलेसाहेब कार्यकारी संचालक यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, कारखान्याचे चिफ इंजिनिअर श्री.बाळासाहेब शिंदे,सेक्रेटरी श्री.थोरवे,इलेक्ट्रिकइंजिनिअरुश्री बाहुबली आणि इंजिनिअर,केमिस्ट आणि कारखाना कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठीआणि टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत साखर उद्योगतील प्रथितयश सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री.आहेरसर यांचे वरिल व्याख्यान आयोजित केले होते.कारखान्याचे कारखान्याचे चिफ इंजिनिअर श्री.बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले.श्री .घुलेसाहेब कार्यकारी संचालक यांनी श्री.आहेरसाहेबांचा परिचय करून दिला आणि नंतर श्री.आहेर सरांचा साखर कारखान्याचे सेक्रेटरी श्री.थोरवेसाहेब यांनी सत्कार केला.
या सत्रात आहेरसरांनी
।।"एकच ध्यास,एकच ध्यास" ।।
।।"शुन्य टक्के मील बंद तास"।।
या संकल्पनेचे महत्त्व विशद केले .नंतर श्री आहेरसरांनी कारखाना सुरू असताना मील बंद झाल्यावर कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान कसे होते हेआकडवारीनिशी सांगितल्यावर यावर उपाययोजना म्हणून "एकच ध्यास,एकच ध्यास"
"शुन्य टक्के मील बंद तास या संकल्पनेची अंमलबजावणी"याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली आणि कारखान्याचे आर्थिक नुकसान कसे टाळता येते हे सांगितल्यावर त्यामुळे मिलचे रिझल्ट सुधारतात.वेळेची बचत होऊन उत्पादनात वाढ होते.
दुसर्या सत्रात हाय प्रेशर बाॅयलरची चालू असताना घ्यावयाची काळजी आणि ऑफ सिझन मध्ये करावयाचे मेंटेनन्स तसेच बाॅयलरची सुरक्षितताआणि शासकीय नियमांचे पालन या विषयावर शास्त्रीय पद्धतीने विवेचन करून काही टिप्स दिल्या.बाॅयलरचे डिझाईन रचना त्यासाठी वापरले जाणारे मटेरियल,बाॅयलरची फीड वाॅटर केमिस्ट्री,पोलूशन नियंत्रण ,बगॅस सेव्हिंग,वीज उत्पादन या विषयावरील प्रश्नांची श्री.आहेरसर यांनी समाधानकारक उत्तरे दिली.त्यामुळे उपस्थितांमध्ये बाॅयलर आणि मीलचे कामकाजाविषयीआत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले .दुस-या सत्रात कार्यक्रमात चिफ इंजिनिअर श्री.बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.त्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला.

Comments
Post a Comment