मनाची मशागत ।।

आम्ही हाकतो नांगरवखर अन काढतो वसण। 

जमिनीची करतो मशागत अन काढतो तण।।

ढवळया पवळया नंदी साथीला दोघेजण। 

पाटपाण्यानं शेतातलं पीक  होई आबादान।।

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। 

म्हणे सावता माळी त्याला आम्ही राजी।। 

कैवल्याच्या  चांदण्याला भूकेला चकोर।

चंद्र शोधतो पांडूरंगा   करावया  मन थोर ।।रजतम सत्व गुणांचे  आम्ही पुतळे।

कामक्रोध मदमोह असूनि आम्ही सोवळे।।

माझं  माझं  कबाडओझं कळेना आज। 

झाला उशीर  परमार्थाला राखा आता लाज।।

आपलाच म्हणोनी  परदु:खाला द्यावी साद।

शेजारी नाही परका  त्याला करा आबाद।।

भूकेल्यासाठी करावा आता कोडंयाचा मांडा । 

करा मनाची मशागत  सोडा मोहाचा तांडा ।।


आहेर वाळू रघुनाथ नासिक 

Comments

Popular posts from this blog

PRESENT CONDITION OF RETIRED SUGAR WORKERS AND DIRECTION FOR THEIR FUTURE.

SUGAR INDUSTRY TECHNICAL SOLUTIONS